दूषित पाणीपुरवठा प्रकरणी अखेर आरोग्य पथक बोरखेडात दाखल
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
बोरखेड : संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड येथील १४० गावांना योजनेतून दुषित पाणी पुरवठा होत असल्याने आजार होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील चमूने शुक्रवारी गावात भेट देत रुग्णांची तपासणी केली.
गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना ताप, पोटाचे विकार वाढले. याबाबत विविध वृत्तपत्रातून वृत्त प्रकाशित होताच दखल सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उजवणे यांनी घेतली.
शुक्रवारी दुपारी दोन वाजता आरोग्य तपसणी पथकाने गावातील घरोघरी जाऊन रुग्णाची तपासणी केली. तसेच, रुग्णाचे रक्ताचे नमुने घेतले. तपासणी करण्यासाठी आरोग्यसेवक एन. एस. मोरे, आशा अलका आगलावे यांनी केले. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, तसेच आजारासंबधी माहिती देऊन औषधांचे वाटप केले.