Breaking News
recent

गोविंदराव पवार विद्यालय व जुनिअर कॉलेज भवानीनगर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे दहावी बारावी मध्ये घवघवीत यश संपादन केले...



राहुल चव्हाण @बारामती

इंदापूर: दि.१५

इंदापूर:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फुले  एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित गोविंदराव पवार विद्यालय व जुनिअर कॉलेज भवानीनगर मधील १०वी व १२ विच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. 

शाळेचा निकाल १०० टक्के लागला. त्यात इयत्ता दहावी मधील चिरंजीव अथर्व ढाकणे ८०.२० टक्के गुणांसह शाळेत अव्वल स्थान मिळवले.  तसेच  द्वितीय शिवराज सुरडकर, तृतीय सलोनी चितारे यांनी अव्वल स्थान मिळवले. तसेच कला वाणिज्य व विज्ञान शाखेचा एकत्रित शेकडा निकाल 99.40% एवढा त्यामध्ये कला शाखेमध्ये कुमारी सुनीता चव्हाण  विद्यार्थिनीने अवल स्थान प्राप्त केले. तेजस्वी खाडे, अंजली गरजे यांनी यश संपादन केले. तसेच वाणिज्य शाखेमध्ये ऐश्वर्या गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकावला. अपेक्षा गायकवाड द्वितीय तसेच प्रज्ञा भोईटे तृतीय क्रमांक पटकावला. तसेच विज्ञान शाखा मध्ये अथर्व थोरात यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी दिव्या जगताप यांनी द्वितीय क्रमांक तसेच वैष्णवी गोसावी तृतीया  क्रमांक पटकावला. याबद्दल  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच शाळेचे मुख्याध्यापक कॉलेजचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Powered by Blogger.