Breaking News
recent

लांडे वस्ती येथे दुचाकीस लागलेल्या आगीत मोठे नुकसान; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…



गंगापूर प्रतिनिधी /गणेश म्हैसमाळे

गंगापूर तालुक्यातील माहुली येथील लांडे वस्ती येथे १५ मे रोजी सकाळच्या सुमारास एक दुचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आप्पासाहेब प्रकाश लांडे यांनी अलिकडेच टीव्हीएस कंपनीची MH 20 BX 6795 क्रमांकाची दुचाकी खरेदी केली होती. ही गाडी नेहमीप्रमाणे त्यांनी बाळू शिंगाडे यांच्या शेताशेजारी असलेल्या चारीवती रात्री उभी केली होती. सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडताच त्यांना ती गाडी पूर्णपणे आगीच्या निस्ताभूत अवस्थेत दिसून आली.

दुचाकीच्या ठिकाणी जळालेली राख, विघटित अवयव व फोटोमध्ये दिसणारी पूर्णतः खाक झालेली स्थिती पाहता आगीचा तीव्रतेचा अंदाज येतो. या घटनेची माहिती मिळताच परिसरात भीती पसरली असून उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. काहींनी ही घातपाताची शक्यता वर्तवली आहे.आग लागण्याचे नेमके कारण शोधले जात आहे.


 प्रतिक्रिया:- “गाडीला अचानकपणे आग लागणं ही सामान्य गोष्ट नाही. यामागे काहीतरी कारण असावं. सध्या सर्वजण चिंतेत आहेत. रात्रीच्या वेळेस वस्तीवर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.”-शंकर  लांडे ,शेतकरी


Powered by Blogger.