Breaking News
recent

गोपाळकुमार कळसकर यांची 'इंडियन एक्सलंस अवार्ड २०२५' साठी निवड ...!

 



 प्रतिनिधी, गोपाळकुमार कळसकर

 भुसावळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडियन एक्सलंस अवार्ड २०२५’ साठी आयुध निर्माणी वरणगांव येथील पत्रकार गोपाळकुमार चांगदेव कळसकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. दैनिक बाळकडू, व्हाईस ऑफ योजना दर्पण, सारथी महाराष्ट्राचा, अधिकारनामा, तेजोमय न्यूज, दर्पण, दैनिक अहिल्याराज इ.विविध वृत्तपत्रांतून व सामाजिक माध्यमांतून  कायम जनसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. झेप फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेचे ते जळगांव जिल्हा सचिव असून या संस्थेच्या माध्यमातून विविध समाजसेवी उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यांच्या या समाजसेवी कार्याची दखल दैनिक अहिल्याराज वृत्तपत्र व हिंदी मराठी पत्रकार संघाने घेतली आहे. 

त्यांना हिंदी पत्रकार दिवस निमित्त व दैनिक अहिल्याराज वृत्तपत्राच्या वर्धापन दिनी १ जून रोजी भातृमंडळ, मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे भव्य समारंभात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. ‘इंडियन एक्सलंस अवार्ड’ हा देशपातळीवरील मानाचा पुरस्कार मानला जातो. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. दरवर्षी दैनिक अहिल्याराज वृत्तापत्रातर्फे व हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे  या पुरस्कार सोहळ्याचे वर्धापनदिनी आयोजन करण्यात येते. गोपाळकुमार कळसकर यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या मेहनतीची पावती मानली जात आहे. यापूर्वीही त्यांना अनेक सामाजिक संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक  संस्था, स्थानिक नागरिक व पत्रकार संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.


Powered by Blogger.