Breaking News
recent

श्रीक्षेत्र चाकरवाडीत संत माऊलींच्या पुण्यस्मरणार्थ रौप्य महोत्सवी सोहळ्याचे भव्य आयोजन.

 



तालुका प्रतिनिधी  मारोती गाडगे/ गेवराई 


गेवराई (बीड):विसाव्या शतकातील महान संत विभूती सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली दादा महाराज श्री क्षेत्र चाकरवाडी यांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरणार्थ रौप्यमहोत्सवी सोहळा व भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे शनिवार दि.७ जुन २०२५ पासून आयोजन करण्यात आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय शिवकथा प्रवक्ते प.पू.पं.श्री प्रदीप मिश्राजी (सिहोरवाले) यांच्या अमृततुल्य वाणीतून शिवमहापुराण कथेचे रविवार दि.८ जुन २०२५ ते दि.१४ जुन २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले. तरी संत माऊली दादा महाराजांच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यास भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तपोनिधी, शांतीब्रह, गुरुवर्य महादेव महाराज (तात्या) श्री क्षेत्र चाकरवाडीकर यांच्यासह माऊली भक्तगण मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.

        मराठवाड्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे संत माऊली दादा महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच येथे गर्दी असते. तसेच दर अमावस्येला लाखो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी दुरदुरवरुन हजर असतात. दरम्यान यावर्षी संत माऊली दादांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरणार्थ रौप्य महोत्सवानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह  व आंतरराष्ट्रीय शिवकथाकार प. पू. प्रदीप मिश्राजी सिहोरवाले यांची शिवमहापुराण कथेचे दुपारी १ ते ४  वाजेपर्यंत दि.०८ जून ते १४ जून दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी अभंगवाणी ( संगीत भजन) महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक मंडळी सादरीकरण करणार आहे. रात्री अभंग संकीर्तन सेवा दि. ०७ जून शनिवार लक्ष्मण महाराज मेंगडे, (श्री क्षेत्र बंकटस्वामी मठ संस्थान, नेकनुर), दि. ०८ जून रविवार प्रकाश महाराज बोधले, (संतपिठ श्री क्षेत्र पैठण), दि. ०९ जून सोमवार अमृताश्रम स्वामी महाराज (मंगलमूर्ती देवस्थान, राजुरी नवगण), दि. १० जून रोजी मंगळवार भागवताचार्य मुकुंद काका जाटदेवळेकर, दि.११ जून रोजी माऊली दादाच्या रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरणार्थ गुलालाचे कीर्तन वारकरी संप्रदायभूषण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक, नागापूरकर यांचे सकाळी १० ते १२ होणार आहे. रात्री रामायणाचार्य समाधानजी महाराज शर्मा यांचे ८ ते १० वेळेत होणार आहे. दि १२ जून व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी, दि.१३ जून  महादेव महाराज राऊत, बीड, तर शनिवार दि.१४ जून रोजी ह.भ.प.संदीपान महाराज हासेगावकर यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होणार आहे. कीर्तन सेवा झाल्यानंतर हरिजागर, भारुड, हरिपाठ, काकडा भजन, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य दिव्य स्वरुपात आयोजन श्री क्षेत्र चाकरवाडी येथे संत माऊली दादांच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात करण्यात आले आहेत. तरी माऊली भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या भव्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तपोनिधी शांतीब्रह गुरुवर्य श्री ह. भ. प. महादेव महाराज (तात्या) चाकरवाडीकर यांनी केले आहे.

   भव्य सोहळ्यासाठी साडे तीन लाख स्क्वेअर फूटामध्ये वॉटर प्रूफ मंडपाची उभारणीची 

संत माऊली महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पंडित मिश्रा महाराज यांची शिव महापुराण कथेसह विविध धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या एक महिन्या पासून मंडप उभारणीची तयारी सुरु आहे. साधारणता ही व्यवस्था साडे तीन लाख स्क्वेअर फूटामध्ये वॉटर प्रूफ मंडपाची उभारणीची तयारी करण्यात आली आहे. आणि जेवण मंडप हा चार ते पाच एकर जागेमध्ये आहे. हा संपुर्ण मंडप हा वॉटर प्रूफ असणार आहे.-

भाविकांच्या गाड्यांच्या पार्कींगसाठी शंभर एक्करमध्ये पार्किंगची व्यवस्था.

    संत माऊली महाराज यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहामध्ये आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते प्रदीप जी मिश्रा यांची शिवमहापुराण कथा होणार आहे. या कथेसाठी महाराष्ट्रातून नव्हे तर देशांमधून दहा ते बारा लाख भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पार्किंगची व्यवस्था ही येळंबघाट पासुन एक किलो मीटर अंतरापासुन ते माऊली मंदिरापर्यंत साधारणत शंभर एकरच्या परिसरामध्ये पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे.

   बीड जिल्ह्यातील या मंगल कार्यालय, हॉटेल, शाळा महाविद्यालयात राहण्याची व्यवस्था..

 संत माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना राहण्यासाठी बीड ते धारशिव, केज या शहरापर्यंत येणारे मंगल कार्यालय तसेच हॉटेल मध्ये राहण्याची तयारी करण्यात आली आहे. मांजरसुंबा येथील कन्हैया हॉटेल, राधिका हॉटेल, नेकनूर येथील माऊली मंगल कार्यालय, प्रमिला देवी पाटील महाविद्यालय, कालिका प्रतिष्ठान मंगल कार्यालय, गणेश मंगल कार्यालय, तसेच बळवंतराव कदम महाविद्यालय येळंबघाट, चाकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळा , महाविद्यालय येथे व्यवस्था करण्यात आली आहे.


Powered by Blogger.