Breaking News
recent

किशोर माध्यमिक विद्यालयात योग दिन साजरा



प्रतिनिधी गणेश कदम. 


बिलोली तालुक्यातील अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये योग दिन साजरा करण्यात आला या दिवशी सर्व प्रथम कलाशिक्षक राजेंद्र कुमार बैस सर यांनी योगासनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व तसेच शाळेतील इंग्रजी शिक्षक गंगाराम दोनतुलवाड व विज्ञान शिक्षक अशोक विभूते सर या दोघांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवत प्रत्येक योगासनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी योगासनामध्ये भाग घेतला व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट योगासने केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश्वर अटकळे , राजेंद्र मोरे, विजय कचवे, दत्तात्रेय शिंगणवाड चंद्रकांत कनशेट्रे, तगेवार, सिद्धेश्वर उपलवार ज्ञानेश्वर बिजलीकर अधिक कर्मचारी उपस्थित होते.

Powered by Blogger.