वरणगांव सिव्हिल सोसायटी तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर
भुसावळ: प्रदूषणाच्या समस्येने सर्वत्र उग्र रूप धारण केलेले असून, पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक झाले आहे. या संबंधी समाजाला जागृत करण्यासाठी व समाजामध्ये वृक्षारोपण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिनाचे औचित्य साधून वरणगाव सिव्हिल सोसायटीच्या विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन शिवसृष्टी पार्क ,वरणगाव येथे करण्यात आले. अर्जुन, वड,पिंपळ,गुलमोहर, बहावा आदी ऑक्सिजन भरपूर प्रमाणात देणाऱ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मागील वर्षी लागवड केलेली ६० वृक्ष यांचे संगोपन सोसायटीने यशस्वी केलेले असून सर्व वृक्ष आज जिवंत आहेत.यावेळी डॉ.राहुल भोईटे यांच्या मार्गदर्शनात वरणगाव सिव्हिल सोसायटीचे सदस्य गोपाळ गावंडे ,अक्षय भावसार, रामचंद्र पाटील ,सदानंद जोशी, राजू गायकवाड ,हेमंत पाटील ,आर एन पाटील डॉ. रवींद्र माळी, कैलास पाटील, निलेश झोपे ,सचिन बेलोकार अनिल शिंदे सर, गोपाळ कळसकर, श्री परसे यांनी सहभाग नोंदवला.वरणगाव व परिसरातील नागरिकांना सुदृढ आरोग्य लाभावे तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नगरपालिका, खाजगी मोकळ्या जागा इत्यादी ठिकाणी या पावसाळ्यात वृक्षलागवड करण्याचा वरणगाव सिव्हिल सोसायटीचा मानस असल्याचे सदस्यांनी सांगितले. जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा सोसायटीमार्फत नागरिकांना यावेळी देण्यात आल्या.