तब्बल ३० वर्षांनी गेवराई ते कटचिंचोली गावी लालपरिचे आगमन!.
तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/ गेवराई
तब्बल ३० वर्षानंतर गेवराई ते कटचिंचोली बस सेवा बंद होती, कटचिंचोली ते दैठण रस्त्याची दुरवस्था झालेली होती.कटचिंचोली येथे सातवी पर्यंत शाळा आहे.सातवी पासून पुढे ४ कि मी दैठण या गावी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पायी चालत जावे लागत असे.रस्ता खराब असल्याने कोणतेही वाहन सरासरी येत जात नव्हते.परंतु या वर्षी दैठण ते कटचिंचोली या रस्त्याचे डांबरीकरण झाले.
गावातील सरपंच रविंद्र निवारे व उपसरपंच ज्ञानेश्वर कोकणे यांनी गेवराई चे आमदार मा.विजयसिंह पंडित यांची भेट घेऊन ग्रामपंचायत प्रस्ताव , अर्ज गेवराई ते कटचिंचोली बस सेवा शाळेसाठी चालू करावी आसे निवेदन आमदार मा विजयसिंह पंडित साहेब यांना द्याण्यात आले. आणि आमदार याचं शिफारस आणि कटचिंचोली ग्रामपंचायत चा प्रस्ताव बसस्थानक प्रमुख यांना द्याण्यात आले.
आगार प्रमुख यांनी प्रास्तावचा विचार करून शाळेच्या मुला,मुलींना शाळेसाठी बस सेवा आज दिनांक १५जुलै मंगळवार रोजी सुरू करण्यात आली.गेवराई ते कटचिंचोली बस (लालपरीचा) वेळ सकाळी कटचिंचोली येथे सकाळी ८ वाजता आहे व सायंकाळची वेळ ४ वाजता आहे.
परंतु सकाळ चा वेळ सकाळी ९ वाजता कटचिंचोली येथे पाहिजे असं शाळकरी विद्यार्थ्यांचं व गावातील नागरिकांचं म्हनं आहे.बस(लालपरी) सकाळी कटचिंचोली येथे आली आस्था गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
बसचालक व कंडक्टर यांच शाल, श्रीफळ,हार घालून स्वागत केले.बसला पन श्रीफळ फोडून हार घालून श्री लिंबाजीराव पवार यांनी स्वागत केले.तब्बल ३० वर्षानंतर कटचिंचोली चे सरपंच 'रविंद्र निवारे' यांनी आमदार मा.विजयसिंह पंडित साहेब यांना भेटून बस सेवा सुरु केल्या बद्दल गावकऱ्यांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी सरपंच यांचे आभार मानले.
बसच्या सांगता साठी , गावचे सरपंच रविंद्र निवारे, उपसरपंच ज्ञानेश्वर कोकणे,ह.भ.प.महाराज डॉ.तुळशीराम (अण्णा) खोटे, लिंबाजी पवार, पत्रकार मारोती गाडगे,सोपान कोकणे द्वारकादास कोकणे,मधुकर औटी, प्रदीप भाले, ग्रामपंचायत सदस्य सुनिल अंगरखे, संतोष भुत्कर, सचिन खोटे,सुंदर औटी,भारत येवले, शिवाजी शिंदे, राहुल पर्हाड,सुंदर अंकुश आसे अनेक गावांतील मंडळी उपस्थित होती.