उल्हासनगर विठ्ठलवाडी मध्ये सतत पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे झाड उमलून पडले
उल्हासनगर ३ राजीव गांधी चौक शांतीनगर उल्हासनगर ३ या ठिकाणी दिनांक १ जुलै पासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एक अतिउंच व भव्य असे लिंबाचे झाड जमिनीपासून मुळा सकट उमलून पडले आहे . यामुळे काही काळ या परिसरा अवतीभवती गाड्यांची कोंडी झाली असून लोकांची जाण्या येण्याची तारांबळ, झाली होती . या सर्वांमध्ये मुख्य बाब म्हणजे कोणाची जीवित हानी व कसलेही नुकसान झालेले नाही. काही काळातच प्रशासनाने येऊन सर्व परिस्थिती सुरळीत आणली.
