Breaking News
recent

कमी होल्टेज च्या वीज पुरवठ्यामुळे वाकोडी ग्रामस्थ हैरान

"वीज वितरण कंपनीला वारंवार निवेदने,तक्रारी देऊनही वीज वितरण कंपनीची हेतूपुरस्पर डोळे झाक"


     तालुक्यातील वाकोडी गावात भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना वीज वितरण कंपनी तर्फे कमी होल्टेज चा वीजपुरवठा होत असल्याने वाकोडी चे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कनिष्ठ अभियंता मलकापूर ग्रामीण भाग 3 यांना वाकोडी च्या ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाकोडी गावात सद्यस्थिती अत्यंत कमी होल्टेज चा वीज पुरवठा होत असून संध्याकाळी सहा वाजे नंतर कोणतेच विद्युत उपकरण चालत नाही. पंखे,कुलर, फ्रीज ह्या तर फक्त शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. कमी होल्टेज चा वीज पुरवठा होत असला तरी वीज बिल मात्र दर महा "चारशे चाळीस" होल्ट च्या पूर्ण झटक्यात येत आहे. 

     या कमी होल्टेज च्या वीज पुरवठ्याचा फटका विद्यार्थी वर्गाला सुद्धा बसत आहे सद्यस्थितीत वर्ग एक ते नऊ व वर्ग अकरा चे पेपर सुरू असून विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करताना कमी होल्टेज मुळे असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.  तरी सदर गंभीर  बाबीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन पूर्ण होल्टेज चा वीज पुरवठा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

    येत्या आठ दिवसात पूर्ण होल्टेज चा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीतर्फे करण्यात न आल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा वाकोडी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.  निवेदनावर दिपक पाटील, योगेश काजळे, सतीश काजळे, दिपक सिंह गौर, सुभाष खराटे, नितीन पवार, पवण शेळके यांचे सह इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

    वाकोडी गावात कमी होल्टेज चा वीज पुरवठा होत असल्याने पूर्ण होल्टेज चा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीतर्फे करण्यात यावा म्हणून दिनांक 19 एप्रिल 2021 व दिनांक 30 जुलै 2021 तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री साळी साहेब, यांना निवेदने दिली आहेत. एक वर्ष उलटूनही वीज वितरण कंपनीचे मुजोर अधिकारी या गंभीर बाबीकडे हेतुपुरस्पर पणे डोळेझाक करीत आहेत. येत्या आठ दिवसात वाकोडी गावात पूर्ण होल्टेज चा वीजपुरवठा न झाल्यास ग्रामस्थांसह वीज वितरण कंपनीचे कार्यालयासमोर उपोषण,धरणे आंदोलन करण्यात येईल. 

दिपक पाटील, ग्रामस्थ वाकोडी.

    वाकोडी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून सद्य स्थितीत लोणवडी फिडर वरून वाकोडी ग्रामस्थांचा वीजपुरवठा यशोधाम फिडरवर जोडण्यासाठी चे काम पूर्ण झाले असून ट्रांसफार्मर ची मागणी करण्यात आली आहे ट्रांसफार्मर उपलब्ध होताच वाकोडी ग्रामस्थांना पूर्ण होल्टेज चा वीजपुरवठा निश्चितच होईल.

श्रीधनकर , कनिष्ठ अभियंता,मलकापूर भाग 3.


Powered by Blogger.