Breaking News
recent

हिंदू देवतांची बदनामी करून समाजात तेढ वाढविणारे वक्तव्य केल्याबद्दल आ.अमोल मिटकरी यांचावर कारवाई करावी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

 


    मलकापूर (प्रतिनिधी)- आ.अमोल मिटकरी यांनी हिंदू देवता व हिंदू समाजातील पुरोहित (ब्राह्मण) यांचे बाबत बेताल व खोटे वक्तव्य करून हिंदू देवतांची बदनामी करून समाजात तेढ व वैमनस्य वाढविण्याचे कृत्य केल्याबद्दल त्यांचेवर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मलकापूरच्या वतीने ठाणेदार मलकापूर शहर आणि मुख्यमंत्री यांच्याकडे उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचेमार्पत आज २५ एप्रिल रोजी तक्रार आणि निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आ.अमोल मिटकर यांनी १९ एप्रिल रोजी सांगली येथील जाहीर सभेत हिन्दू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या रामभक्त हनुमान स्तोत्र म्हणताना मारूती स्तोत्र व हनुमान चालीया याचे मिश्रीत अभद्र भाषेत टिका टिप्पणी करतांना हिंदू देवतेचा व श्रध्देचा जाणिवपूर्वक अवमान करून जाती धर्मात तेढ वाढवून वितुष्ट निर्माण केले आहे. तसेच परंपरागत हिंदू विवाह पध्दतीवर टीका करतांना कन्यादान या हिंदू संस्कार पध्दतीवर गलिच्छ व द्वेषमूलक टीका केली. हिंदू धर्मियांचे संस्काराबद्दल व गलिच्छ टीका करून त्यांनी भावना दुखावण्याचे काम करीत जाणिवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. तेव्हा अशाप्रकारे वक्तव्य करणारा आ.अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेले व आ.मिटकर यांच्या वक्तव्यास दाद देणारे शासन प्रतिनिधी ना.जयंत पाटील व ना.धनंजय मुंडे यांचेविरूध्द भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष अशोक व्यास, तालुकाध्यक्ष विशाल दवे,तालुका उपाध्यक्ष मोरेश  महाजन,ब्राह्मण सभा अध्यक्ष नरेश देशपांडे, विप्र समाज अध्यक्ष मोहन शर्मा, विप्र समाज उपाध्यक्ष सुरेश शर्मा व दामोदर शर्मा,विप्र समाज सचिव अँड मनीष  शर्मा,यांचेसह अखिल भारतीय ब्राह्मण पदाधिकारी व समाज बांधवांच्या स्वाक्षरया आहेत.

Powered by Blogger.