Breaking News
recent

दुचाकी व एसटी अपघातातील युवकाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी ठिय्या मांडताच बसचालकावर गुन्हा दाखल ! मृत दुचाकीस्वारावर नोंदवला होता गुन्हा !

 मलकापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्ग  क्र.६ वर धानोरा नजीक २२ एप्रिलला एसटी बसने दुचाकीला धडक दिलयाने एका युवकाचा मृत्यू झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. औरंगाबाद येथे उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी ग्रामीणच्या ठाणेदारांनी बसचालकाला वाचवत दुचाकी स्वारावरच गुन्हा दाखल केलड होता. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी काल पोलीस ठाण्यात ठिय्या माउत आक्रोश केला. नातेवाइक आक्रमक झाल्याचे पाहून ठाणेदारांनी अखेर बसचालकावर गुन्हा दाखल केला.

राष्ट्रीय महामार्गक्र ६ चे चौपदरीकरणाचे काम सुरु असून धानोरा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. नांदुरा तालुक्यातील चांदुरबिस्वा येथील अर्पित डोके (वय २०) वफरदीन खन अयाजउल्लाखान (वय २०) हे दोघे दुचाकीने २२ एप्रिल रोजी सकाळी
    ११ वाजता येथील एका कॉलेजमध्ये जात होते. धनोरा (विटाळी) येथील उड्डाण पुलाजवळील वळणावर त्याच्या दुचाकीस भरधाव बसने धडक दिली. अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. मंगेश भाकरे, ज्ञानेश्वर वेरूळकर व नागरिकांनी मदत करत त्यांना बसने उपजिल्ला रुग्णालयात दाखल केले. फरदीन खान याची तब्येत गंभीर असल्यामुळे त्याला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून औरंगाबादला पाठविण्यात आले. २४ एप्रिल रोजी फरदीन खान याचा दुर्देवी मृत्यू झाला.
    दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार मिझा यांनी बसचालकाला वाचविण्यासाठी दुचाकी स्वारांवरच गुन्हा दाखल केल्याची माहिती समजताच संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. बसचालकावर गुन्हा दाखल करा, अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्याचा इशारा दिला. त्यामुळे नरमलेल्या ठाणेदार मिर्झा यांनी बसचालकावर गुन्हा दाखल केला.

Powered by Blogger.