जि.प.;ग्रा.पं.रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम
अकोला राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता राबवावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानूसार अकोला जिल्हा परिषद मधील 35-हातरुण निवडणुक विभागातील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता मतदार यादीचा कार्यक्रम याप्रमाणे दि. 28 एप्रिल रोजी प्रारुप मतदार यादी तहसिलदार बाळापूर यांनी प्रसिद्ध केली आहे. दि.28 ते दि.5 मे 2022 पर्यंत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप व हरकती घेता येतील.आक्षेप व हरकती तहसिल कार्यालय बाळापूर येथे स्विकारण्यात येतील. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि.11 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता मतदार यादीचा कार्यक्रम नुसार दि.28 रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी सर्व संबंधित तहसिलदार यांनी प्रसिद्ध केली आहे. कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादीवर आक्षेप व हरकती घेण्याचा अंतिम दि.28 एप्रिल ते दि.4 मे पर्यंत असुन आक्षेप व हरकती संबंधित तहसिल कार्यालयात स्विकारण्यात येतील. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि.5 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं., पं.स., जि.प., निवडणूक संजय खडसे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायतीचा तपशिल खालील प्रमाणे
अ.क्र. तालुका एकुण रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता ग्रामपंचायतची संख्या रिक्त सदस्य पदाची संख्या
१ तेल्हारा ०७ १० ,२ अकोट २२ ४९, ३ मुर्तिजापूर ३५ ६१, ४ अकोला २१ २९, ५ बाळापूर १३ १७, ६ बार्शिटाकळी २० ३२, ७ पातुर १० १२, एकुण १२८ २१०