महाराष्ट्र दिनी ग्रामीण भागात एसटीच्या बसफेऱ्या होणार सुरू
आगाराच्या अडचणी कायम, १०० टक्के कर्मचारी कामावर
एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाविषयी तोडगा नाही. मात्र, १०० टक्के कर्मचारी कामावर परतले आहेत. महाराष्ट्र दिनी ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू होणार आहेत. मात्र उत्पादनावर या बसफेऱ्या सुरू ठेवायच्या की नाहीत, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. उलटपक्षी दिवसेंदिवस हा प्रश्न चिघळत राहिला आहे. दुसरीकडे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने मागील काळात बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. बसफेऱ्यांची सुरुवात जनतेसाठी दिलासादायक ठरली आहे.
मात्र, ग्रामीण भागातील बसफेऱ्या सध्या बंद आहेत. त्यामुळे मुक्कामी बसेस नाहीत. ग्रामीण भागातील • नागरिकांना खासगी वाहतूक व्यवस्थेत अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना मात्र अनंत अडचणींचा सामना करावा लागला आहे. मलकापूर आगारातून औरंगाबाद, अकोला, अमरावती, सोलापूर, नागपूर जळगाव खान्देश अशा विविध ठिकाणी व्यक्त केली आहे. ५ हजार ३८३ कि. मी. बसेसचा प्रवास सुरु आहे. मात्र, ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद आहेत. त्याविषयी चौकशी केली असता त्या बसफेऱ्या येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सुरू १ करण्यात येतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे
• एसटीचे उत्पन्न वाढले पाहिजे. त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील बसफेऱ्या येत्या १ मे पासून सुरु होतील, पण, त्यासाठी उत्पन्न हा महत्त्वाचा भाग आहे. नसल्यास त्या बसफेया बंद कराव्या लागणार आहेत -दादाराव दराडे, -आगार व्यवस्थापक रा. प. महामंडळ विभाग, मलकापूर