Breaking News
recent

मा. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा राज्यव्यापी दौरा



चिखली - रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी मे महिन्यात राज्यव्यापी दौऱ्याचे आयोजन केले आहे.
रयत क्रांती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरवात रत्नागिरी पासून तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यासह दौऱ्याची सांगता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे होईल,
  माजी मंत्री सदाभाऊ खोत तसेच रयत क्रांती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दि.२५ एप्रिल रोजी ऑनलाईन बैठक पार पडली.
   पुढील मे महिन्यात रयत क्रांती संघटनेतर्फे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत आक्रोश यात्रा राज्यभर काढणार असून सदर बैठकीत रयत आक्रोश यात्रे संदर्भात नियोजन करण्यासाठी सदर बैठक आयोजित केली होती.
  गेली अडीच वर्ष झाली महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत.
 परंतु राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप-प्रत्यारोप व कारवाई तसेच भ्रष्टाचार यामध्ये गुंग झाले आहे.
    सुरुवातीची अतिवृष्टी, चक्रीवादळ, दुष्काळ कोरोना महामारी, त्याचप्रमाणे अतिरिक्त उसाचा प्रश्न, खंडित वीज पुरवठा,लोड शेडींग यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत तसेच मराठासमाजाचे शैक्षणिक आरक्षण व ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण हा प्रश्न मिटलेला नाही तसेच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा यामधील भोंगळ कारभार यामुळे विद्यार्थी सुद्धा प्रचंड अडचणीत आहेत,विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आले आहे. कारण पंढरपूर मध्ये वीज कनेक्शन बंद केल्यामुळे एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली व नगर जिल्ह्यामध्ये ऊस कारखान्याला जात नाही म्हणून एका ८० वर्षाच्या वयस्कर शेतकऱ्यांने आत्महत्या केली, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्याने सुद्धा पुण्यामध्ये आत्महत्या केली.
    कायदा व सुव्यवस्था यासह अनेक प्रश्न महाराष्ट्रातील रयतेचे गंभीर झालेले असतांना सुद्धा राज्य सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे या जनतेच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधावे यासाठी रयत क्रांती संघटनेतर्फे राज्यव्यापी रयत आक्रोश यात्रा काढली जाणार आहे,तरी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी बांधवांनी आप आपल्या समस्या जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडे लेखी अथवा तोंडी स्वरूपात पोहचवाव्या जेणेकरून दौर्यादरम्यान शक्य त्या समस्या ऑन दि स्पॉट जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसिल, पोलीस स्टेशन असेल त्या त्या कार्यालयात जाऊन सोडवल्या जातील अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे कोअर कमिटी सदस्य तथा विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी दिली.
Powered by Blogger.