Breaking News
recent

पाच गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर



बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : बुलडाणा तालुक्यातील चौथा, गिरडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गोंधनखेड, डोंगरखंडाळा, वरवंड ग्रा.पं अंतर्गत असलेल्या गोंधनखेड व चिखली तालुक्यातील कोलारा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. चौथा येथील लोकसंख्या 2250 असून येथे दररोज 64 हजार 920 लीटर्स पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. गोंधनखेड ग्रा.पं गिरडा येथील लोकसंख्या 445आहे. येथे दररोज 23 हजार 400 लीटर्स पाणी पुरविण्यात येणार आहे. तसेच डोंगरखंडाळा येथील लोकसंख्या 7544 असूल येथे दररोज 1 लक्ष 60 हजार 970 लीटर्स पाण्याचा पुरवठा होणार आहे.  गोंधनखेड ग्रा.पं वरवंड येथील लोकसंख्या 102 आहे. येथे दररोज 12 हजार 40 लीटर पाणी पुरविण्यात येईल. तसेच कोलारा येथील 4640 लोकसंख्येला दररोज 1 लक्ष 72 हजार 800 लीटर पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी,  बुलडाणा यांनी कळविले आहे.

Powered by Blogger.