श्री गुरुदेव सेवाश्रम च्या वतीने सर्वांगीण सुस्ंस्कार शिबीराचे आयोजन
नांदुराः देश- धर्म- संस्कृतीला पोषक असा नागरिक घडविण्यासाठी आचार्य वेरुळकर गुरुजींच्या मार्गदर्शनात सन 1981 पासून राष्ट्रधर्म प्रचार समिती श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे आयोजन करीत असते दरवर्षी याची व्याप्ती वाढत असून अनेक जिल्ह्यात संस्कार शिबिरे घेण्यात येत आहेत.ज्या ठिकाणाहून हे संस्कार गंगोत्री उगम पावली ते म्हणजे श्रीगुरुदेव सेवाश्रम नांदुरा खुर्द या वर्षी सुद्धा या ठिकाणी दि-१ मे ते २० मे २०२२ दरम्यान श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना प्रामुख्याने बौद्धिक, व्यायाम व संगीत या विषयाअंतर्गत मल्लखांब, लाठी काठी, लेझीम, कराटे, गायन, वादन, वकृत्व कला श्रीमदभगवतगीता, ग्रामगीता, थोरामोठ्यांचे चरित्र, वक्तशीरपणा, संगीताचे प्राथमिक ज्ञान इत्यादी सद्गुण संवर्धना चे विषय शिकवल्या जाणार आहे.
या शिबीरादरम्यान विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे सदर शिबिराचे ह. भ. प श्री मनोज महाराज चौभे शिबीर प्रमुख असून त्यांच्यासोबत तज्ञ शिक्षकांची टीम काम करणार आहे संपूर्ण शिबिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी राष्ट्रधर्म युवा मंच ने उचललेली आहे संपूर्ण लोकसहकार्यावर चालणाऱ्या या शिबिराला सहयोग करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अपेक्षित प्रवेश झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येईल त्यासाठी त्वरित सदर सर्वांगीण सुसंस्कार शिबिरामध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन सुद्धा आयोजकांतर्फे करण्यात आले असून खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क- साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
9552439411, 9822726235 8275027664, 9881853614