Breaking News
recent

जागतिक मलेरीया दिनानिमित्त जनजागृती रॅली व कर्मचाऱ्यांचा गौरव



बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  जागतिक मलेरीया दिनानिमित्ताने आज 25 एप्रिल रोजी जिल्हा हिवताप कार्यालय व आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती रॅली व उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानुसार सुरूवातीला जिल्हा सामान्य रूग्णालय येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. गोफणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते,  जिल्हा परीचारीका प्रशिक्षण केंद्राच्या श्रीमती खेडेकर व श्रीमती उईके, नितीन श्रीवास्तव,श्री. हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
   या प्रसंगी जिल्हयातील बहुतांश: आरोग्य कर्मचारी व प्रशिक्षणार्थी परीचारीका रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जिल्हा हिवताप अधिकारी एस.बी. चव्हाण यांनी जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्याचा उद्देश जिल्हयातील हिवतापा संबधीची परीस्थिती सांगीतली व लवकरच जिल्हा मलेरिया मुक्त होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असून मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे सांगितले. याप्रसंगी उत्कृष्ठ कार्य करणा-या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी नर्सींगच्या
विद्यार्थींनी किटकजन्य रोगाविषयीचे पथनाटय सादर केले. तसेच वन्य जीवसोयरे परीवाराने तयार केलेल्या किटकजन्य आजाराविषयीच्या लघुपटाचे विमोचन करण्यात आले.
     तद्नंतर मान्यवरांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी जिल्हा हिवताप दुरीकरण लवकरच करेल अशी आशा व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांनी हिवतापाचा प्रतिबंधात्मक उपाययोजना करतांना जास्तीत जास्त सामाजिक सहभाग कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उकृष्ट कार्य करणा-या आरोग्य कर्मचा-यांचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या कर्मचा-यांमध्ये सर्वोत्कृष्ट आरोग्य पर्यवेक्षक  प्रथम पुरस्कार एल.आर. पांडे खामगांव, विशेष पुरस्कार श्रीमती निता अवचार, मंगेश दलाल डेंग्यू सेंटीनल सेंटर बुलडाणा, सर्वोत्कृष्ट प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रथम पुरस्कार एस.बी. पुंडकर, प्रा.आ.केंद्र भोनगाव, द्वितीय पुरस्कार ओ.डी.तिवारी, प्रा.आ. केंद्र,पि.गवळी व  तृतीय पुरस्कार श्रीमती ए.एन.जाधव प्रा.आ.केंद्र दे.माळी व जी के बैरी  यांना तसेच उत्कृष्ट आरोग्य सहाय्यक प्रथम पुरस्कार व्ही.जे.हूंबड प्रा.आ.केंद्र नरवेल, जी.एस नागरे, प्रा.आ केंद्र आडगांव राजा, द्वितीय पुरस्कार एम.एस.चिंचोळकर, प्रा.आ.केंद्र सोनाळा, तृतीय पुरस्कार पी.डी.जाधव बुलडाणा उत्कृष्ट आरोग्य कर्मचारी  प्रथम पुरस्कार व्ही.टी.वायाळ, प्रा.आ.केंद्र डोणगांव, द्वितीय पुरस्कार सुशिल एन.वाघ चिखली शहर तृतीय पुरस्कार, पी.एच.वैराळकर प्रा.आ.केंद्र गणेशपूर व विलास घुगरे प्रा.आ.केंद्र मडाखेड यांना प्रथम पुरस्कार तसेच प्रोत्साहनपर  के. पी. आनंदे, आरोग्य कर्मचारी प्रा.आ.केंद्र रोहणा, आरोग्य सेविका श्रीमती रुपाली तांबेकर, प्रा.आ.केंद्र दे.माळी, द्वितीय श्रीमती शिवगंगा आघाव प्रा.आ.केंद्र अंढेरा, तृतीय पुरस्कार श्रीमती प्रतिभा चव्हाण प्रा.आ.केंद्र अटाळी, जयश्री भगत, कमल उबाळे व अलका डोंगरदिवे आशा वर्कर या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. रॅलीमधील कर्मचाऱ्यांचे टी-शर्ट व कॅप यावरील आरोग्य संदेश यांनी सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. 
   जिल्हा मलेरिया पतसंस्था व जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या सौजन्याने सदर टी-शर्ट व कॅप पुरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाल हिवाळे, एस.एस.गडाख, पी.डी.जाधव, श्रीमती.टी.आय.शेख, मनोज जगताप, प्रवीण सपकाळ, डी.सी जाधव, अनिल बिलारी,आर.जी.पाखरे, जी. एन. साळोख,श्री. वनारे, श्री. काकडे, एल.एस.साळोख, प्रवीण धुळधर, श्री. बेंडवाल, श्री. सरदार, श्री. सवन, श्री. गवळी आदींनी प्रयत्न केले. संचालन सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पी.बी होगे यांनी तर आभार प्रदर्शन आरोग्य पर्यवेक्षक एल.आर. पांडे यांनी केले. 
Powered by Blogger.