मलकापुर ग्रामीण हद्दितील जुगारयांवर छापा
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मा . अपर पोलिस अधिक्षक साहेब खामगाव यांना माहीती मिळाली की शिवाजी नंदकिशोर धोरण हा त्याचे उमाळी येथील शेतातील खोलीत रात्री 52 ताश पत्यांचा एका बादशाह नावाचा जुगार पैश्याचे हरजितवर खेळत आहे . अशा खात्री लायक खबरे प्रमाणे अपोअसा खामगांव यांनी आदेश दिल्या प्रमाने दिनांक 28/04/2022 रात्रि 12:00 वा पथकातील अधिकारी पो उप नी पंकज सपकाळ पो.हे. कॉ गजानन बोरसे नापोका गजानन आहेर , संदिप टाकसाळ , राम धामोडे यांनी शिवाजी धोरण याचे उमाळी येथील शेतात असलेल्या खोलीवर महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे छापा टाकून 18 जुगारी पकडून त्यांचे ताब्यातुन जुगाराचे नगदी 52980/-रु 16 मोबाईल,10 मोटर सायकल ,52 ताश पत्ते, जुगारचे साहित्य आस एकूण 762969/-रु चा मुद्देमाल जप्त करुण आरोपी विरुद्ध कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदाप्रमांने पोस्टे मलकापुर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रस्तुत कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक सा बुलढाणा यांचे मार्गदर्शना खाली मा. अपर पोलीस अधीक्षक सा, खामगांव यांचे आदेशा प्रमाणे पथकातील अधिकारी, अमलदार यांनी केली आहे