गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
मोताळा येथील प्रभाग क्र. ५ मधील ३५ वर्षीय युवकाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना आज गुरुवार २८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव मंगेश मानकर असे आहे. प्राप्त माहितीनुसार मोताळा शहरातील प्रभाग क्र. ५ मध्ये राहणाऱ्या मंगेश शंकर मानकर (वय ३५) याला दारु पिण्याचे व्यसन होते. तो कोणतेही काम करत नव्हता. आज २८ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजेच्या दरम्यान मृतक मंगेशची पत्नी माया मानकर ही मुलीला बसस्टॅण्डवर सोडण्यासाठी गेली असता घराजवळ राहणाऱ्या इसमाने तिला सांगितले की, तुझ्या पतीने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतली आहे. घरासमोर मोठी गर्दी जमली असून तो मरण पावला अश्या माहिती वरून मृतक मंगेश मानकर यांची पत्नी आशा मानकर हीने घरी जाऊन खात्री केली असता राहत्या घरातील टिनाच्या नाटीला ओढणीच्या सहाय्याने मंगेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, अशी फिर्याद बोराखेडी पोस्टे. ला दिली. बोराखेडी पोलिसांनी भादंवीचे कलम १७४ नुसार मर्ग दाखल केला आ