Breaking News
recent

ग्रंथालय उदघाटन समारंभ


    


    नांदूरा : स्थानिक कोठारी शैक्षणिक संकुलात अद्यावत सोयसुविधांनी सुसज्ज असे ' शिक्षणसेवाव्रती श्री . सुरजरतनजी कोठारी स्मृती ग्रंथालया ' चे आज उत्साहात उदघाटन करण्यात आले . मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा .श्री . राजेश एकडे आणि माजी गृहराज्यमंत्री तथा अमरावती पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री . रणजित पाटील साहेब यांनी फित कापून ग्रंथालयाचे उद्घाटन केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि.नांदूरा इंग्लिश एज्युकेशन सोसायटी च्या अध्यक्षा मा . उमादेवी कोठारी मॅडम होत्या .

     याप्रसंगी मा .श्री . प्रकाश मुकुंद साहेब (शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प. बुलडाणा ) तसेच मा .श्री .राहुल तायडे (तहसिलदार , नांदुरा ) यांची विशेष उपस्थिती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव मा. श्री . विठ्ठल कोठारी  यांनी केले तर अतिथी परिचय कोठारी माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य मा . प्रा .श्री . किशोर काकडे सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा . प्रा .श्री . खेरडे सर यांनी तर  आभारप्रदर्शन कोठारी गर्ल्स हायस्कुल नांदुरा च्या मुख्याध्यापिका मा. सौ . वर्षाताई कुलकर्णी मॅडम यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोठारी शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले .



Powered by Blogger.