Breaking News
recent

अखिल भारतीय भाट समाजाचे प्रथम राज्यस्तरिय अधिवेशन श्रीक्षेत्र शेगावनगरी मध्ये



 प्रथमच  महाराष्ट्रातील सर्व भाट समाजाचे अधिवेशन श्री क्षेत्र शेगाव येथे दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे.यात संपुर्ण महाराष्ट्रातून भाट समाजबांधव शेगाव येथे पोहचणार आहेत. अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.भि.रा.इदाते , (अध्यक्ष , विमुक्त व घुमन्तु जनजाती विकास बोर्ड,नवी दिल्ली ) उपस्थित राहणार आहेत.सदरकार्यक्रमाच्या निमीत्याने २३ एप्रिल च्या पुर्वसंध्येला राज्यभरातुन शेगाव येथे आलेल्या समाजातील महीलांचा परिचय मेळावा व हळदी-कुंकु चा कार्यक्रमाचे आयोजीत केला असुन त्याच वेळी राज्य कार्यकारणी व राज्यातील सर्व जिल्हा संघटन पदाधिकारी यांची संयूक्त बैठकीचे आयोजन केले आहे.

रविवार दिनांक २४ एप्रिल ला सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुढील कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. त्यात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, देवी सरस्वती माता व वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण तसेच वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना व सरस्वती वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल.यात समाज प्रबोधनकार तुषार सुर्यवंशी यांचे समाज प्रबोधनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. सदर अधिवेशन श्रीकृपा लाँन्स व मंगल कार्यालय , आनंदसागर रोड , विसावा भक्तनिवास जवळ शेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनाचे आयोजक अखिल महाराष्ट्र भाट समाज व संपूर्ण राज्य पदाधिकारी असुन. स्वागत समिती बुलढाणा जिल्हा संघटन आहे.


Powered by Blogger.