उमंग ॲपसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात
बुलडाणा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामित्त 26 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात डिजीटल इंडिया मोहिमे अंतर्गत उमंग ॲपबाबत प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेला जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सुनील खुळे यांनी उमंग या मोबाईल ॲपबाबत विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, उमंग हे एक केंद्र शासनाचे अॅप असून या ॲपमध्ये शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध प्रकारचे अॅप एकच ॲपमध्ये समाविष्ट केले आहेत.
या सोबतच ज्येष्ठ पनागरिकां सर्विस किंवा नागरिकांसाठी जीवन प्रमाण तसेच इतर युटिलिटी बिल पेयमंट करता येते. हे ॲप 13 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून त्याचे 3.25 कोटी युजर्स आहेत. या कार्य शाळेसाठी महसूल, पुरवठा, पंचायत समिती व कोषागार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.