मलकापूरातील मार्केट यार्ड बेलाड येथे शेतकऱ्यांसाठी मेळाव
मलकापूरः मंगळवार दि. २६/०४/२०२२ रोजी अन्नदाता देवो भवं किसान भागिदारी प्रार्थमिकता हमारी मोहिमे अंतर्गत बाजार समिती मलकापूर मुख्यबाजार मार्केट यार्ड बेलाड येथे शेतकऱ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागामार्फत आझादी का अमृत महोत्सव या अभियाना अंतर्गत दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी किसान भागीदारी प्रार्थमिकता हमारी हि मोहिम राबविण्यात येते आहे. केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पूणे यांचे मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कृषि उत्पन्न बाजार समिती मलकापूर शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय योजनेचा लाभ व माहिती मिळणे करीता मलकापूर बाजार समितीचे मुख्यबाजार मार्केट याई बेलाड येथे शेतकऱ्यांसाठी दि. २६/४/ २०२२ रोज मंगळवारला सकाळी १०.०० वाजता शेतकरी मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यात केंद्र शासनाच्या व बाजार समिती मलकापूर च्या पुढील योजना बाबत जनजागृती करण्यात आली १. राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) २. देशात १०००० एफपिओस्थापनेचा लक्षांक ३. कृषि पणन सुविधा योजना इत्यादी माहिती शेतकऱ्यांना देणेसंबंधाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक कृषी विकास ग्रामिण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने श्री रवी पाटील सर जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीचे आशिष नाफडे, बाजर समिती चे जेष्ठ व्यापारी कचरूभाऊ टावरी, बाजार समितीचे सचिव अजय जाधव, अ सलीम अ मुनिर सईद भाई. दाताळा येथिल शेतकरी बारसु पाटील प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालक व इ नाम विषयो माहिती प्रशांत तळोले यांनी दिली, खी पाटील सर यांनी १०००० एफपीओ बाबत मार्गदर्शन केले, प्रतवारी विषयी पराग ढोले यांनी सविस्तर माहिती दिली, तसेच बाजार समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या पणन सुविधांविषयी प्रशांत तळोले यांनी सविस्तर माहिती दिली या प्रसंगी माजी सचिव भरत जगताप, राधेश्याम शर्मा, सुनील चोपडे सुभाष गुजर, राहुल खंगार यांचेसह पप्पू अग्रवाल, पप्पू तोष्णीवाल, राजेश भन्साली, सचिन रेदासणी यांचे सह बाजाराचे संपूर्ण व्यापारी, हमाल मापारी कर्मचारी यांचे सह शेतकरी बंधू उपस्थित होते.