बाजार समित्यांवर पुन्हा होणार प्रशासकाची नियुक्ती
मलकापूर
मलकापूर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर दोन वेळा दिलेली मुदत वाढही संपुष्टात आली. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ देणे उचित ठरणार नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक करण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आदेश दिला आहे. त्यामुळे मलकापूर बाजार समितीचा प्रशासकीय कार्यकाळ संपुष्टात आल्याने येत्या दोन- तीन दिवसांत प्रशासकाची नियुक्ती होणार असल्याचे संकेत आहेत. बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका २२ एप्रिल २०२१ रोजीच्या आदेशानुसार २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश दिला होता.
तसेच त्या दिवशी कार्यरत सर्व संचालक मंडळ, अशासकीय प्रशासक मंडळ, प्रशासक यांना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन प्रत्यक्षात संचालक मंडळ कार्यरत होईपर्यंत पुढील ३ महिने मुदतवाढ दिली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायाल दाखल याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नमूद केले. सद्य:स्थितीत बाजार समित्यांच्या कार्यरत संचालक मंडळांना २२ एप्रिल २०२२ च्या पुढे मुदतवाढ देणे उचित होणार नाही, असे नमूद केले. नियुक्त संबंधित संचालक मंडळाची निवडणूक होऊन प्रत्यक्ष संचालक मंडळ कार्यरत होईपर्यंत किंवा पुढील ६ महिने यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत कृउबा समित्यांवर प्रशासक यांची नियुक्तीचा तत्काळ देण्याचे आदेशात असे नमूद केले.