डोनगाव मध्ये ग्रामपंचायत साठी २९ एप्रिल रोजी सरपंच पदाची निवडणूक
बुलढाणा जिल्हातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या डोणगावमध्ये - ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागून १६ महिने झाले तरी सरपंच नव्हता अश्यात वार्ड क्रमांक एक मधील एका जागेसाठी गल्ली ते दिल्ली पर्यंत लढाई चालली. ज्यात सौ सलमा बी सय्यदनुर अतार ह्या विजयी झाल्या. ज्याने सरपंचपदाची निवडणूक ही २९ एप्रिल रोजी होणार असून ही निवडणूक बिनविरोध पार पडते की ऐन वेळेवर यात स्टे मिळून निवडणूक पुन्हा लांबणीवर पडते हे पाहणे विशेष ठरणार.
डोणगाव ग्राम पंचायतचे निकाल जानेवारी
२०२१ मध्ये लागले होते ज्यात शिवसेना ७,
अपक्ष २,
कॉंग्रेस व राष्ट्रवादी पॅनलचे ८ असा
निकाल लागला होता. मात्र यातील वार्ड क्रमांक एक मधील सौ गजाला परवीन सद्दाम शाह
यांची जागा ही नामनिर्देशपत्र भरतांना चुकीचा भरल्या गेल्याने त्या ठिकाणी सौ सलमा
बी ह्याच एकमेव उमेदवार शिल्लक राहिल्या होत्या. मात्र गजाला परवीन यांनी कोर्टात
दाद मागितल्याने त्यांना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणूक लढण्याची
परवानगी देण्यात आली होती. मात्र अश्यात सौ गजाला बी यांनी नामनिर्देशपत्र भरताना
चुक केल्याने जी लढाई नागपूर खंडपीठ ते निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्ट अशी ही लढाई
चालली. ज्यात निवडणुकीमध्ये पराजित झालेले सलमा बी ह्या कोर्टाने पात्र ठरवल्या
अश्यात ही निवडणूक २९ एप्रिल रोजी होणार असून त्यात कोणत्या पॅनलचा उमेदवार सरपंच
बनेल या पेक्षा ऐन वेळेवर सरपंच पदाच्या निवडणुकीवर स्टे मिळेल निवडणूक होऊन
त्याचा निकाल राखून ठेवल्या जाईल हे पाहणे विशेष राहील मागील १५ वर्षात
कित्येकवेळी येथील ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीवर तर कधी सरपंच
पदाच्या निवणुकीच्या निकालावर स्टे मिळालेले आहे.