तूर्तास मास्क सक्ती नाही-आरोग्य मंत्री राजेश टोपेंची स्पष्टोक्ती
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगत सध्या राज्यात मास्क सक्ती करणार नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गर्दीच्या ठिकाणी माससक्तीची शक्यता त्यांनी नुकतीच वर्तविली होती. देशातील काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून, जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आवश्यक ती सर्व पाउलं उचलली जात आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यभरात मास्कसक्ती जरी लागू नसली, दंड जरी नसला तरी आम्ही रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहोत तरी लोकांनी मास्क घालण्याचे आवाहन त्यांनी केले आहे तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जवळपास १९ जिल्ह्यांत हृदयाच्या उपचारासाठी निधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ४ जिल्ह्यांत कॅन्सर आणि हृदयाच्या उपचारासाठी सरकारने २५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
लहानग्यांच्या लसीकरणासाठी प्रतीक्षा? ६ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली असून त्यामुळे पालकांच्या चिंता मिटल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, आता यावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मोठेविधान केले असून, ५ ते १२ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्रालय एनटीएजीआय आयोगाच्या शिफारशीची प्रतीक्षा करेल, असे म्हटले आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होण्यासाठी पालकांना अजून काही दिवस प्रतीक्षा कारावी लागणार असल्याचे दिसते.