पाण्यासाठी गेले अन जीव गमावून बसले कंटेनर दुचाकीला धडक; १ ठार; १ गंभीर १
भरधाव कंटेनरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने एक विद्यार्थी ठार झाला असून दुसरा जखमी असल्याने त्याचेवर मेहकर येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी साडेबारा ते एक वाजे दरम्यान मेहकर डोणगाव रस्त्यावर शुभम हाँटेल ते सत्यजित पेट्रोल पंप च्या जवळपास झाला.मेहकर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरासमोरील आय. टी. आय इलेक्ट्रिकल ट्रेड दुसऱ्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी शैलेश राठोड (वय १८) व नवनाथ जुमडे(वय १८) हे दोघे पाणी आणण्यासाठी मोटरसायकलने शहरात आले होते. परत जाताना हाँटेल शुभमच्या जवळा दुचाकी क्र एमएच २८ AA८३५९ ला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने क्र. MH12HD2930 ने जोरदार धडक दिली.
या अपघातात शैलेश राठोड जागीच ठार तर मित्र नवनाथ जुमडे जखमी झालाअपघात झाल्यावर रुग्ण वाहिका लवकर न आल्याने आ. संजय रायमुलकर यांचे स्वीय सहाय्यक विलास आखाडे, गजानन फुटानकर, पिंटू ठाकूर व नागरिकांनी पिंटू ठाकूर यांच्या स्वतःच्या गाडीने दोघांना डॉ. गजानन सातपुते यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. जखमी नवनाथवर सध्या तेथेच उपचार सुरू आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आय.टी.आय काँलेज मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गत दोन महिन्यांपासून योग्य नसल्याने विद्यार्थ्यांनी वर्गणी करून ते बाहेरून कँन भरून आणत होते. आजही हे विद्यार्थी पाणी आणण्यासाठी गेले होते तर प्रभारी प्राचार्य डी. पी. पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही वर्गणी करून आठ दिवसापूर्वी ४५ हजार झाला खर्च केले. बोअर घेतला. आर. ओ. फिल्टर जुमडे सुरू केला.
आम्ही विद्यार्थ्यांनस पाणी झाला. आणण्यासाठी परवानगी दिली नाही. एकंदरीत कॉलेजमध्ये पाण्याची व्यवस्था असती तर विद्यार्थी बाहेरून का पाणी आणत होते याचे उत्तर कोण देणार? ही गंभीर बाब आहे. आज ठार झालेला शैलेश हा मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील रहिवासी होता. आई वडिलांना तीन मुली व हा एकुलता एक मुलगा होता. तर जखमी नवनाथ हा अमडापूर ता. चिखली येथील रहिवासी आहे. आपल्या शिक्षकाच्याच दुचाकीवर ते पाणी आणण्यासाठी गेले होते. मात्र या दोघांनी विचारले नाही असे कॉलेज म्हणते. अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक जागेवर न थांबता शहराकडे येत असता संतप्त नागरिकांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालयासमोर अडवून चालकाला चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.