Breaking News
recent

29व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ.श्रीपाल सबनीस यांची निवड



शिवाजी खंदारे,(जालना ) 

 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 28 व 29 मे 2022 रोजी मंठा(जालना) या ठिकाणी होणाऱ्या29 व्या अखिल भारतीय नवोदित  मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिले अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा सरचिटणीस अनिल खंदारे यांनी दिली आहे, 

साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जालना येथे नुकतीच बैठक झाली होती यामध्ये सर्वांनूमते हि निवड करण्यात आली,या बैठकीला राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, प्रदेश संघटक अमोल कुंभार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  फुलचंद नागटिळक, महासचिव अॅड.अविनाश आवटी,भरत मानकर,अशोक कुरूंद आदीजण उपस्थित होते,  या अगोदर ज्येष्ठ साहित्यिक वसंत बापट, द.मा.मिराजदार,केशव मेश्राम, सुरेश भट, नारायण सुर्वे, रा.रं. बोराडे, डाॅ.जनार्दन वाघमारे, सुवर्णा पवार भास्कर चंदनशिव  यांनी संमेलनाध्यक्षपद भूषिवले आहे, 

ग्रंथदिंडी उद्घाटन सोहळा,परिसंवाद,कविसंमेलन, कथाकथन,असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे.29 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस हे चिकित्सक लेखक,अभ्यासक,संशोधक म्हणून ख्यातकिर्त आहेत, ज्ञानेश्वर ते आंबेडकर, संत नामदेव-तुकारामांचे सांस्कृतिक संचित, आदिवासी प्रतिभावंताचे साहित्य, छत्रपती शिवाजीराजे आणि ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद विवेकवादी भूमिका, उपेक्षितांची पहाट,संचिताची चांदणवेल,मुक्तक,सेक्युलरिझम व संत साहित्य,इहवादी संस्कृती शोध,गंधवेडी समीक्षा,इतिहास आकलनाचे प्रयोग, संतत्व व देवत्वाचा शोध,नवी पालवी नवा रंग, वारकरी संगीत आणि संचित,बहूसांस्कृतिक व्यक्तीत्वाचे  रंग- तरंग, इतिहास, संशोधनात्मक ग्रंथ,ललित लेखन, वगनाट्य, चरित्रलेखन,समीक्षान्मक ग्रंथाचा समावेश आहे, एकूण 83 ग्रंथाचे विपुल लेखन त्यांनी केले आहे, पिंपरी येथे संपन्न झालेल्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषिवले आहे,


Powered by Blogger.