बनावट डोमिसाईल सर्टिफिकेट बनविल्याप्रकरणी एका वकीला सह दोन जणांना अटक
वकिलासह ऑनलाइन कर्त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी
मलकापूर:(अजय टप )
शहरातील पारपेठ भागातील फकीरपुरा मधील एका ऑनलाईन चालकाने व वकिलाने संगनमत करून एसटी बॅच बिल्ला बनविण्यासाठी बनावट डोमिसाइल सर्टिफिकेट तहसिलदार यांच्या डिजिटल स्वाक्षरी द्वारा बनवून दिल्याप्रकरणी नायब तहसीलदार बाळासाहेब सुभाष दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी त्या तिघांविरुद्ध कलम 420,465,471,34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून यातील तिन्ही आरोपींना शहर पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे तर आज दुपारी त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने वकिलासह ऑनलाइन कर्त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील पारपेठ भागातील आजम खान अयुब खान वय 27 यास एस.टी.ड्रायव्हर चालक पदासाठी बॅच बिल्ला काढण्यासाठी डोमीशियल दाखला काढायचा असल्याने ॲड मो.वसीम मो.मुस्ताक वय 31 ह्याने पैसे घेऊन सै.साजीद सै.नुरोद्दीन वय 31याचेशी संगनमत करून तहसिलदार यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी करून बनावट डोमिशियल दाखला बनवून दिला तो दाखला घेऊन आजामखान अयुबखान बॅच बिल्ला बनविण्यासाठी कागदपत्रे घेऊन दि.06 एप्रिल 22 रोजी नायब तहसीलदार बाळासाहेब सुभाष दराडे यांच्या कडे गेला असता सदरचा डोमीशियल बनावट दिसल्याने त्यांनी या बाबतची फिर्याद शहर पोस्टे ला दिल्यावरून शहर पोलिसांनी उपरोक्त कलमान्वये गुन्हे दाखल केले काल रात्री आजामखान अयुबखान, ॲड.मो.वसीम मो.मुस्ताक,सै.साजीद सै.नुरोद्दीन या तिघांना अटक केली आज न्यायालयासमोर त्यांना उभे केले असता आजामखान अयुबखान यास एमसिआर तर ॲड.मो.वसीम मो.मुस्ताक,सै.साजीद सै.नुरोद्दीन ऑनलाईन चालक या दोघांना तिन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे पुढील तपास ऐपीआय सुकदेव भोरकडे करीत आहे.