कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला 50 लाखांची मदत
![]() |
पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण |
सैय्यद जमील्लोदीन हे कर्तव्यावर असताना त्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला. शासनाच्या निकषाप्रमाणे कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख रूपयांची मदत देण्यात येते. त्यानुसार आज सैय्यद जमील्लोदीन यांच्या पत्नी परवीन बी सैय्यद जमील्लोदीन , मुली सनाया अहवाद आणि अलिना कशफ यांना पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच कोविडमुळे पालकत्व गमावलेल्या चिंचोली, ता. चिखली येथील वेदांत संतोष सुलताने आणि तुषार संतोष सुलताने या दोन बालकांच्या नावे प्रत्येकी पाच लाख रूपयांच्या ठेवीचे प्रमाणपत्रही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.