मलकापुर ते जिगाव बस सेवा पूर्ववत सुरू करावी.
आगार प्रमुखला निवेदन चांदुर बिस्वा तालुका नांदुरा मागील वर्षी दिवाळी पासून पगार वाढीसाठी व इतर काही मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन नाही कर्मचाऱ्यांची संपाचे बंड पुकारले तेव्हा पासून सामान्य प्रवासी वर्गाचे अतोनात हाल होत होत. काही मागण्या पूर्ण होताच संपुष्टात आला आहे गेल्या आठ दिवसापासून बस सेवा पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहे परंतु ग्रामीण भागातील बसफेऱ्या अध्यापही बंद आहे.
या बस सेवा सुरू करण्याकरिता चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोष पाटील यांनी आगार प्रमुख मलकापूर येणार निवेदन दिले आहे. सदर निवेदनात नमूद केले आहे या अगोदर मलकापूर -जिगाव, मलकापूर -चांदुर बिस्वा ही बस सेवा सुरू होती परंतु संप संपुष्टात येऊन सुद्धा अद्यापही सुरू न झाल्याने सामान्य प्रवासी वर्गाला आर्थिक भुर्दंड पडत असून अतोनात हाल होत आहे. या पर्सेस पूर्वी ज्या वेळेत सुरू होत्या त्या वेळेतच पूर्ववत सुरू करण्यात याव्यात व सामान्य जनतेला होणारा त्रास कमी करावा असे म्हटले आहे.