क्रीडामंत्री सुनील केदार यांना पत्रकार भवनासाठी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे निवेदन
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर 11/5/22 महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांना पत्रकार भवनासाठी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहर हे बुलढाणा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ व रेल्वे लाईन वर असलेले महत्त्वाचे शहर आहे अजूनही पत्रकार बांधवांना हक्काचे पत्रकार भवन नाही. शासनाच्या विविध अधिकारी व राजकीय संघटनांना बातम्या देण्याकरिता, सर्व वृत्तपत्र चॅनल यांच्या पत्रकार परिषद करिता व पत्रकारांचे बातम्या लिहिण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून पत्रकार बांधवांना पत्रकार भवनासाठी जागा नगर पालिकेच्या मालकीची व ताब्यातील न. प. शाळा क्रमांक 1 बंद असून ती किंवा आपल्या क्षेत्रातील एखादी जागा पत्रकार भवना करिता मिळावी असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रतीलीपी माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा, उपविभागीय अधिकारी मलकापूर, तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद यांना देण्यात आल्या आहे.
यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघा च्या धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, सतीश दांडगे विदर्भ सचिव, गौरव खरे जिल्हाध्यक्ष, अजय टप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, उल्हासभाई शेगोकार तालुका अध्यक्ष, कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव, अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, श्रीकृष्ण भगत शहर सचिव, संदीप सावजी, विनायक तळेकर, बलराम बावस्कर, दीपक इटनारे, नथूजी हिवराले, नागेश सुरंगे, करणसिंग सिरसवाल, प्रा प्रकाश थाटे कोषाध्यक्ष, प्रमोद हिवराळे, धरमेशसिंह राजपूत, अनिल झनके, सय्यद ताहेर, योगेश सोनवणे,यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.