मुंबईमध्ये गोर सेनेच्या क्रांतिकारी मोर्च्याला लाखोच्या संख्येने उपस्थित राहा-आकाश राठोड
लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गोर सेना तालुका सचिव मोताळा आकाश राठोड यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे. याशिवाय जातिनिहाय जनगणना स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ओबीसी चे आरक्षण अबाधित राहावे रद्द करणे सारथी व बार्ती च्या धर्तीवर भारत देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली तरी सुद्धा आमचा हक्क, आमचा सन्मान, आम्हाला न्याय अजूनही मिळालेला नाही. या व इतर मागण्यांसाठी गोर सेनेच्या माध्यमातून मुंबईच्या क्रांतिकारी मोर्चा लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका सचिव मोताळा आकाश राठोड यांनी केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 11 मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा धडकणार आहे.
या मोर्चाचे प्रमुख मागण्या भारत स्वातंत्र्यानंतरही बंजारा समाज विविध योजनांपासून वंचित आहे या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अकरा तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजन केले आहे. या विराट मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्र मधून ओबीसी बांधवांनी प्रत्येक जिल्हा मधून विद्यार्थ्यांना सवलती देणे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा पातळीवर न ठेवता विभागीय पातळीवर देण्यात यावे जिल्हा पातळीवर फक्त अर्ज घेण्यात यावे व इतर मागण्यासाठी गोर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संपतभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेशभाऊ चव्हाण यांच्या आदेशाने क्रांतिकारी विराट मोर्चा आझाद मैदानावर धडकणार असून महाराष्ट्रातील ओबीसी बांधव बांधव आजी-माजी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी यांनी येथे अकरा मे ला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नेते आकाश राठोड गोर सेना तालुका सचिव मोताळा यांनी केले आहे.