खंडोबा मंदिर परिसरात नंगर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
वडनेर भोलजी
तालुक्यातील ग्राम वडनेर भोलजी येथे दिनांक 6 मे रोजी श्री खंडोबा मंदिर परिसरात नंगर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाच तारखेला रात्रभर खंडेरायाचा जयघोष करत मल्हाराव होळकर, राजमाता अहिल्याबाई यांच्या जीवन चरित्रावर भक्तिमय वातावरणात वाघे मंडळींनी भारुड आणि लोकगीते सादर केली. स्वयंवर चा मान हिंगणा कारेगाव या गावच्या वाघे मंडळी ला मिळाला सदर नंगर सोहळ्यात नरवेल, दाताळा, जिगाव ,देवधाबा, चांदुर बिचवा, शेंबा , इत्यादी पन्नास गावातील जय मल्हार मंडळ तसेच वाघे मंडळी मोठ्या उत्साहात सामील होऊन नंगर सोहळ्याची शोभा वाढवली येळकोट येळकोट.. जय मल्हार जय मल्हार च्या जय घोष करीत वडनेर भोलजी गावातील शेतकरी संतोष पुंडलिक पाचपोळ यांनी नगर तोडून आनंदोत्सव साजरा केला .
या कार्यक्रमाला संपूर्ण गावातील समाज बांधव महिला पुरुष बालक बालिका मोठ्या उत्साहात सहभागी होते. विशेष उपस्थिती म्हणून मलकापूर विधानसभेचे आदरणीय आमदार राजेश भाऊ एकडे यांनी संतोष पाचपोळ यांचा शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यावेळी मा श्री चैनुसुख संचेती राजेश भाऊ एकडे वडनेर भोलजी ग्रामपंचायतचे सरपंच पती संतोष भाऊ डीघे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन जी देशमुख शिवसेना जिल्हा उपप्रमुख वसंतरावजी भोजने नांदुरा उपसभापती संतोष डिवरे शैलेश मिरगे निळकंठ भगत यांनी नंगर सोहळ्यात सहभाग घेऊन संपूर्ण समाज बांधवांना नंगर सोहळा च्या शुभेच्छा दिल्या. सरतेशेवटी महाप्रसाद ( पंगत ) देऊन नंगर सोहळ्याची सांगता करण्यात आली . या सोहळ्यासाठी वसंता खोदिंल दिनकर साबे गजानन करंकार गजानन पाचपोळ निंबाजी वरखेडे ,निंबाजी वसतकार, प्रल्हाद पाचपोळ ,गजानन लवंगे, अमोल पाचपोळ, अशोक दिवनाले, सुरेश पाचपोळ अनिल साबे विलास साबे धनराज कुयटे सहदेव दिवनाले सूनिल कुयटे देविलाल लवंगे विष्णू परमाळे सागर साबे व सर्व धनगर समाज व गावकरी मंडळी यांनी सहभागी होऊन उत्सव साजरा केला