Breaking News
recent

पि. राजा येथील बीएसएफ जवान श्रीकांत सातव यांचे निधन

 


प्रतिनिधी नागेश सुरंगे

      देश सेवेच्या भावनेने सदैव प्रेरित असलेले, भारतीय सैन्यात पश्चिम बंगालमध्ये कार्यरत असलेले भारतीय सीमा बलचे जवान श्रीकांत मधुकर सातव पेठपुरा पिंपळगाव राजा यांचे २९ मे रोजी रात्री निधन झाले. आहे. त्यांचे पार्थिव ३१ में रोजी येण्याची शक्यता असून त्या नंतरच अंतिम संस्कार त्यांचे मूळगावी पिंपळगाव राजा येथे करण्यात येईल, भारतीय सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क झाल्यावरच अंतिम संस्काराची वेळ कळविण्यात येईल अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

   भारतमातेचे जवान श्रीकांत सातव वय ३८ वर्ष हे २००३ या सालापासून भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. अतिशय हिमतीने भारतमातेचे रक्षण त्यांनी केले. त्रिपुरा, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल यासह अन्य राज्यात त्यांनी सेवा दिली. 

   २९ रोजी ते पश्चिम बंगाल येथे कर्तव्यावर होते. कर्तव्य पार पाडत असतांना त्यांना भारतीय सैन्य दलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात उपचार घेत असताना त्यांना मृत्यूने कवटाळले. निधन झाल्याची वार्ता नातेवाईकांना व गावकऱ्यांना मिळाल्यावर पूर्ण गावात शोककळा पसरली. श्रीकांत सातव हे गावाकडे सुटीवर आल्यावर ते गावकरी व मित्रमंडळी मध्ये हरवून जायचे, त्यामुळे ही दुर्दैवी घटना गावकऱ्यांना माहिती पडताच शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव ३१ मे रोजी पश्चिम बंगाल येथून दिल्ली येथे आणले जाणार असून त्यानंतर औरंगाबाद किंवा नागपूर येथे आणले जाईल, त्यानंतर मूळगावी पिंपळगाव राजा येथे आणले जाईल अशी माहिती प्राप्त झाली असून उद्या किंवा परवाला त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. 

Powered by Blogger.