लासुरगावत जागतिक परिचारिकादीन साजरा
गंगापुर प्रतिनिधी प्रकाश सातपुते
तालुक्यातील लासुरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला असून गावातील अशा सेविका डॉक्टर यांच्या उपस्थितीत जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला.रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. 1971 मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला, तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून संपूर्ण जगात १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यावेळी गावातील डॉक्टर आशासेवीका आता यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता जनतेच्या शेवत तत्पर राहून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या यावेळी गावातील अशा सेविका डॉक्टर आरोग्य अधिकारी उपस्थित होते