बुलडाणा अप्पर पोलीस अधिक्षक बनसोडे यांची बदली
बुलडाणा, सागर वानखेडे
बुलडाणा येथील अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांची बदली झाली असून त्यांचे दिल्ली एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) मध्ये नियुक्ती झाली आहे. मूळ बीडचे असणारे बनसोडे यांनी नगर, मुंबई अशा ठिकाणी काम केलेले आहे. पीएसआय म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी डीवायएसपी पदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. बुलडाण्यात त्यांचा कार्यकाळ प्रभावी राहिला.
त्यांनी एनआयए ची परीक्षा दिली त्यानंतर मुलाखत होऊन त्यांची निवड झाली. आता ते राष्ट्रीय तपास यंत्रणेत काम करतील. साधा स्वभाव आणि कर्तव्यदक्षता यामुळे बनसोडे यांनी अल्पावधीतच बुलडाणा जिल्ह्यात आपली छाप सोडली होती. त्यांच्या जागी अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून कोण कार्यभार सांभाळेल हे अद्याप निश्चित नाही.