चाळीस बिघा परिसराला जे चाळीस बिघा हे नाव कायम रहावे
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर शहरातील चाळीस बिघा हे नाव कित्येक वर्षांपासून शहरात प्रचलित आहे या परिसरात अनेक महत्वाची ठिकाणे असुन हॉस्पिटल सारखी ठिकाणे या परिसरात आहे तसेच शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची येथे हॉस्पिटल च्या कामाने येथे वर्दळ असते तसेच शहर व ग्रामीण भागच नव्हे जिल्ह्यात सुद्धा चाळीस बिघा या परिसराला ओळळले जाते.
त्यामुळे या परिसराचे नाव बद्दलविले असता गोंधळ निर्माण होऊ शकतो व नागरिकांना मोठा मनस्ताप होणार हे मात्र निश्चित त्यामुळे कुठलेही नामांतर न करता जे चाळीस बिघा नाव आहे ते कायम ठेवण्यात यावे अशी मागणी चाळीस बिघा परीसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली या संदर्भात नगर परिषद व तहसील कार्यालया मध्ये निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदन सादर करते वेळी चाळीस बिघा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते