बुलडाणा ८ जिल्हा परिषद सदस्य संख्येची वाढ
सदस्य संख्या झाली ६८
राज्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितींचे गण वाढविण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने घेतला होता. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्हा परिषदेतील जागांची संख्या आता ६८ झाली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्राधिकृत प्रकशनद्वारे ग्राम विकास विभागाने २७ एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली आहे. राज्यातील ग्रामीण भागाच्या लोकसंख्येची वाढ बघता जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याअनुषंगाने बुलडाणा जिल्हा परिषदमध्ये पुर्वी ६० एवढी सदस्य संख्या होती. त्यामध्ये ८ ने वाढ होवून आता ती संख्या ६८ झाली आहे.
याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ - अ अन्वये असाधारण क्र. ७० नुसार प्राधिकृत प्रकाशन ग्रामविकास विभाग यांनी अधिसूचनेद्वारे प्रकाशित केले आहे. त्यामध्ये क्र. जि.प.नि.२०२२ / प्रक्र. ३६ / पं.स .-२ / महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ त्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषदेमधील जि.प. सदस्य संख्या आता ६८ इतकी झाली आहे. (१९६२) चा (महा-५) यानंतर त्याचप्रमाणे राज्यातील २५ जिल्हा याचा उल्लेख उक्त अधिनियम असा परिषदांच्या सदस्य संख्येची वाढ केला आहे.
चे कलम ९ च्या उपकलम सुध्दा अधिसूचनेत करण्यात आली (१) मधील तरतुदीनुसार आणि यापुर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करून राज्य शासन सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे जिल्हा परिषदेच्या बाबतीत त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येची वाढ केली असून सदस्य संख्या आगामी निवडणुकी करीता निश्चित करीत असल्याचेही अधिसूचनेत उक्त अधिनियमनाच्या कलम ५८ (१) (अ) नुसार जिल्हा परिषदेच्या प्रत्येक निवडणूक विभाग २ निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.