समाजकंटकांचे हेतू साध्य होऊ देऊ नका - जिपोअ चावरिया
चिखली काही समाजकंटक लोकांच्या भावना भडकावुन किंवा Facebook, Whatsapp, Twiter अशा विविध समाज माध्यमाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करुन सामाजिक परिस्थीती बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे नागरिकांनी जागरुक राहुन अशा प्रकारच्या समाजकंटकाचा हेतु साध्य होणार नाही. याबाबत खबरदारी घ्या, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी केले. २८ एप्रिल रोजी रमजान ईद व आगामी काळात साजरे होणारे सण उत्सवाचे अनुषंगाने जिपोअ चावरीया, आ. श्वेताताई महाले, एएसपी बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांचे प्रमख उपस्थितीत पोलीस स्टेशन चिखली येथे शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
सण उत्सव शांततेत पार पाडण्याबाबत आवाहन केले. मा. आमदार श्वेताताई महाले यांनी चिखली शहराला पारंपारीक वारसा लाभलेला असून शहरातील व मतदार संघातील नागरीक गुण्या गोविंदाने नांदत आहे. तसेच आमामी काळात सुध्दा मतदार संघात सर्व सण उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न होतील असा विश्वास दर्शविला. अपर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे यांनी शांतता समितीच्या माध्यमातून जनतेत जागरुकता निर्माण करावी व समाजात शांतता प्रस्तापित ठेवण्यासाठी सर्व सदस्य व नागरिकांनी प्रयत्न करावे असे आवाहण केले. चिखली शहरातील प्रतिष्ठीत नागरीक रामदास देव्हडे व शेख अनिस शेख बुढन यांनी मनोगत व्यक्त करतांना चिखली शहरासह परीसरात खेळीमेळीचे वातावरण असुन या ठिकाणी सर्व हिंदु मुस्लीम बांधव एकमेकांचे सण उत्सवात सहभागी होऊन उत्साहाने कार्यक्रम साजरे करतात भविष्यात सुध्दा अशाच प्रकारे शांतता अबाधित राहील अशी शहरवासीयांतर्फे पोलीस अधिक्षकांना ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुसर यांनी केले. सदर शांतता समिती बैठकीकरीता पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, मा. आमदार श्वेताताई महाले, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर व शांतता समिती सदस्य उपस्थित होते.