सालई गोंद प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद
मतिन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर :
वनअधिकारी व वनकर्मचारी यांना दिनांक ४ मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहिती आधारे करमोडा (ता.जळगांव जामोद) येथुन एक खाजगी वाहनात सालई गोंद भरुन जाणार असल्याची माहिती मिळाल्याने वनकर्मचारी यांनी नाकाबंदी केली असता सकाळी 3.30 वा. खाजगी वाहन आले अस्ता त्याला वनकर्मचारी यांनी थांबविण्या करीता हात दाखवला परंतु तो भरधाव वेगाने निघुन गेला. वनकर्मचारी यांनी वाहनाचा पाठलाग करुन वाहन धामगांव फाट्या जवळ पकडले परंतु वाहन चालकाने ताब्यातील वाहन सोडून पळ काढला. वनकर्मचारी यांनी वाहन क्रमांक MH २७X६७८६ व सालई गोंद अंदाजे ८७० कि.लो. एकुण मुद्देमाल ४१००००/- रुपयाचा जप्त करुन वनगुन्हा क्रमांक ०५९९१/१४९७५८ दिनांक ४ मार्च २०२२ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेतील फरार आरोपी नामे १) भुरा भालसिंग वास्कले रा.कुवरदेव ता.जळगाव जा २) देवानंद फुलसिंग जाधव रा.जामोद ता.जळगाव (जा.) ३) तेजराव अशोक लोणे रा.जामोद ता जळगाव (जा.) यास तिन आरोपिंना अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजिव विभाग अकोट श्री सुमंत सोळंके सहा.वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजिव सोनाळा श्री सुनिल वाकोडे तपास करीत आहे.
सदर कार्यवाहीमध्ये सोनाळा वन्यजिव परिक्षेत्राचे वनपाल श्री जि.टी. सोळंके, वनरक्षक श्री एम.डी. गवळी, श्री एस. आर. गलोले, श्री डी. ए. बेराड वनरक्षक श्री गजानन क्रमांकांच्या कुटे व इतर कर्मचारी सहभागी होते सदर प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.