Breaking News
recent

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशनचा काळाबाजार

 


नांदुरा. प्रतिनिधी, नागेश सुरंगे

   नांदुरा:दि.२९.बुलडाणा जिल्ह्यात कायमस्वरूपी जिल्हा रेशन पुरवठा अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील सार्वजनिक वितरक प्रणालीचे काम कोलमडले आहे. एक महिना उशिराने होत असलेल्या धान्य पुरवठ्याचा गैरफायदा  काही रेशन माफिया उचलत असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशन धान्याचा काळाबाजार सुरू आहे. 

   काल २८ मे च्या रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने नांदुरा येथील बालाजी प्लॉट भागात पांडुरंग लांडे यांच्या टीन शेडमध्ये लपवून ठेवलेला ३५० कट्टे रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी जवळपास १७५ क्विंटल रेशनचा तांदूळ, तसेच २ इलेक्ट्रॉनिक काटे, असा एकूण ६ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाई पोलीस अधिक्षक  करीत आहे

Powered by Blogger.