Breaking News
recent

देऊळगाव माळी येथे खरीप पूर्व नियोजन व शेतकरी मेळावा संपन्न. कृषिरत्न दिलीप उदासी यांचे मिळाले मार्गदर्शन.



मेहकर

   पंढरपूर म्हणून समजले जाणारे देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे श्री पांडुरंग संस्थान मंगल कार्यालय येथे खरीप पूर्व नियोजन व शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्या, पीकबदल, खत व्यवस्थापन, अंतर मशागत, पिकावरील फवारणी, इत्यादी विषयावर कृषिरत्न डॉक्टर दिलीप उदासी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. विठू माऊली कृषी सेवा केंद्र आयोजित शेतकरी मेळाव्यास परिसरातील बहुसंख्य शेतकरी, तथा पत्रकार बांधव, व मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Powered by Blogger.