शिवा काशीद यांच्या जयंतीनिमित्त आवाहन नाभिक समाजाची मान उंचावेल असे कार्य करा
खैरा (नांदुरा):दि.७.शूर वीर शिवा काशिद यांनी स्वराज्याच्या धण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तमाम नाभिक समाजाची मान उंचावेल असे हे कार्य होते. त्यांच्या त्यागाची जान ठेऊन आपणही सक्रिय रहावे. असे आवाहन श्री. गणेश गणगे यांनी खैरा येथे शिवरत्न शिवा काशीद यांच्या (दि.५.५.२०२२) जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना केले.वीर सावरकर सार्वजनिक वाचनालय खैरा येथे जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती मार्गदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेश गणगे उपस्थित होते. तर अध्यक्ष स्थानी पुंजाजी शिंगोटे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवात शिवरत्न शिवा काशीद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व ग्रंथ पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गणगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गणगे यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मान्यवरांचा ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. श्री गणेश गणगे यांनी आपल्या मनोगतातून आजच्या तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी न जाता महापुरुषांचे विचार अंगीकारले पाहिजे, असे आवाहन केले.त्या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी शिवरत्न शिवा काशीद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमची चहापानानंतर सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक गणगे यांनी केले. कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.