मालमत्तेत हिस्यावरून मारहाण
नांदुरा तालुक्यातील खातखेड या गावातील गजानन देविदास कुऱ्हाडे वय ४२ वर्ष व्यवसाय शेती रा .खातखेड ता.नांदुरा यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार यांची सावत्र सुन अंजना विजय कुऱ्हाडे ही फिर्यादीच्या मुलाच्या लग्ना करीता आली असता अंजना हिला तिच्या हिश्याची एक एक्कर शेती द्या तेव्हा आरोपीतांनी होकार दिला . परंतु ५/५/२२ च्या रात्री ८ वाजता यातील आरोपीतांनी अंजना हिचा नवरा मेला तेव्हापासुन तिला घर दिसले नाही.
आता हिला हिस्सा कशाला द्यायचा असे म्हणुन शेती हिष्याच्या कारणावरुन अंजनास शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी समजविण्यास गेले असता आरोपीतांनी फियार्दीस म्हटले की तुला काय करायचे तु आमचे मध्ये कशाला बोलतो असे म्हणुन आरोपी सुभाष देविदास कुऱ्हाडे यांनी काठीने डाव्या खांदयावर मारहाण केली व देविदास गंगाराम कुऱ्हाडे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली अशा फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून व खाजगी मेडिकल व सिटीस्कॅन वरून नापोका देवचे यांनी दिनांक ०६/०५/२०२२ रोजी रात्री १ वाजता अप नं- २९५/२०२२ कलम ३२४,३२३,५०४,३४ भा.दं.वि.नुसार सदरचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास ना.पो.का. जाधव यांचेकडे देण्यात आले.