मलकापुरात वाढले बकऱ्या चोरीचे प्रमाण एका दिवशी सहा बकऱ्या लंपास
सतीश दांडगे प्रतिनिधी
मलकापूर 18/5/22 येथील गोरगरीब कष्टकरी आपल्या पोटाला चिमटा देऊन शेळीपालन, कुकुटपालन करीत असतात एका शेळीचे दोन शेळ्या होतील. या आशेने कोणी आपल्या मुलीच्या लग्नासाठी तर कोणी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तर पावसाळा मध्ये काम धंदे नसतात या कारणाने उपयोगी पडेल यासाठी तो शेळी पालन करीत असतो यातच बकऱ्याची किंमत 8000 हजर ते 10,000 हजार रुपये एवढी आहे तर मलकापूर शहर येथील भीम नगर व माता महाकाली नगर येथील बकऱ्या चोरीचे प्रमाण फारच वाढले आहे.
येथे 16 मे रोजी भीम नगर येथील शोभाबाई दांडगे यांच्या तीन बकऱ्या, राधाबाई इंगळे यांची यांची एक बकरी तर माता महाकाली नगर येथील वानखेडे यांची एक बकरी अशा एकूण पाच बकऱ्या माता महाकाली जवळून संध्याकाळी 5 च्या सुमारास चोरीला गेली आहे.
अशा भुरट्या चोरांवर पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन आळा घालावा अशा भुरट्या चोरांवर पोलिस प्रशासनाने कारवाई करावी अशी आशा यावेळी चोरीला गेलेल्या महिलांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.