शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला होऊन देखील आरोपी फीरतात मोकाट
प्रकाश सातपुते गंगापुर प्रतिनिधी
शेतकर्याच्या डोक्यात लाकडाणे विटाने मार खुलताबाद तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी गणेश खंडागळे तू आमच्या शेतातून येऊ नको वायर टाकू नको म्हणून पाच जणांनी एकत्र येऊन लाकडाने आणि विटाने डोक्यात प्राणघातक हल्ला केला असून आरोपीवर कलम 143, 147 ,148 ,149 ,324, 323, 504, 506, दाखल झालेले असून आरोपी मात्र शेतकऱ्याला मारण्याच्या धमक्या देत आहे यावर शेतकऱ्याला न्याय मिळेल यावर पोलीस प्रशासन दखल घेईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासाठी जो रस्त्याची अडवणूक करीन त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असेही उप मुख्यमंत्र्यांनी यांनी आदेश दिले परंतु या गावात ज्या व्यक्तीला शेतात जाण्यासाठी अडवणूक करून त्याच्या पाइपलाइनला देखील अडवणूक केली व शेतकऱ्यावर पाच आरोपीनी प्राणघातक हल्ला करून तू पोलीस ठाण्यामध्ये तक्रारदिली परंतु घरी आल्यावर तुला आणि तुझ्या परिवाराला सोडणार नाही असे बोलून घायाळ व्यक्ती रुग्णालयातून घरी गेल्यावर वारंवार धमक्या येत आहे यावेळी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शिवाजी खंडागळे, बाबासाहेब खंडागळे, सागर खंडागळे,आजीनाथ खंडागळे, दादाराव खंडागळे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर पोलीस प्रशासन काय दखल घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे