राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी जिशान आफताब खान यांची निवड
प्रतिनिधी
मेहकर येथील दैनिक द जिल्हा एक्सप्रेस चे मुख्य संपादक जिशान आफताब खान यांची दिनांक 24 मे रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी नियुक्ती पत्र देवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.या निवडीमुळे मेहकर मतदार संघ प्रमाणे मी ईतर ही ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला बळकटी करण्याचे काम जीशान खान करणार आहेत.
त्यांच्या निवडीमुळे युवकांमध्ये नवचैतन्याचे भावना निर्माण झाली असून,त्यांच्यावर मेहकर मतदार संघातून तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे,कार्यालयीन सरचिटणीस अरुण आसाबे, राष्ट्रवादीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नाझेर काझी, यांचे जीशान खान यांनी आभार मानले आहे, तसेच अडवोकेट नाझेर काझी ,पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाला बळकटी देण्याचे काम करू असे यावेळी जीशान खान यांनी बोलताना सांगितले .
