वसाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी सागर झनके
संग्रामपूर: तालुक्यातील वसाडी येथे २६ मे रोजी शेतकऱ्यांना नुझुविडू सिड्स बियान्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सागर जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,नुझुविडू कंपनीचे आशा 9011 हे बागायती व कोरडवाहू वाण असून. हे वाण उभाट मोकळं वाढणारे झाड आहे.या मध्ये पानाची संख्या कमी असल्याने किडी पासून बचाव होतो आणि त्याचा म्हणजे जास्त पावसात बोंड सड होत नाही.
कमी आधिक पाऊस असला तरी हे झाड तक धरून राहते.हे वाण लवकर येणारे वाण आहे.या वानाची मोठी बोड असल्याने उत्पादन जास्त येते. कपाशी लवकर परिपक्व होत असल्यामुळे गुलाबी बोड अळीचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. सदर कार्यक्रमाला प्रशांत इंगळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.यावेळी गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव हजर होते.
